बुलढाणा ( सैलानी) :सैलानी दर्गा परिसरात नेहमीच अनोळखी मृतदेह आढळून येतात. 28 एप्रिलच्या सकाळी देखील एका 45 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. येथील रहिवासी नजीर शेख यांच्या शेतातील टीनशेडच्या खोलीत सदर मृतदेह आढळला याबाबत पोलीस पाटील रामेश्वर गवते यांनी पोलिसांना माहिती दिल्यावरून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद घेतली. टीनशेड मधील खोलीत आढळून आलेला मृतदेह हा अंदाजे 45 वर्षीय पुरुषाचा असून मृतदेहाजवळ रामेश्वर काळे नावाचे आधार कार्ड मिळवून आले आहे. सदर इसमाच्या मृत्यूचे कारण मात्र कळू शकले नाही.पोलिसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवगृहात ठेवला आहे. रंग सावळा, बांधा सडपातळ, अंगात फक्त फुल पॅन्ट व बाजूला कपडे पडलेले होते. सरदार मृतकाची ओळख पटविण्याचे आवाहन रायपूर पोलिसांनी केले आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार जयवंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. ऋषिकेश पालवे करीत आहेत.
45 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला
Hanuman Sena News
0
Post a Comment