अकोला: वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत खळबळजनक दावा केला आहे. ‘येत्या १५ दिवसांत राज्यात दोन ठिकाणी मोठे राजकीय बॉम्बस्फोट होतील, असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.प्रकाश आंबेडकर हे आज एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्त पुण्यात होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मोठा दावा केला. ते म्हणाले, येत्या १५ दिवसांत महाराष्ट्रात मोठं राजकारण बघायला मिळेल. दोन ठिकाणी मोठे राजकीय स्फोट होणार आहेत. त्यामुळे आपण १५ दिवस वाट बघुया. यावेळी त्यांना राज्यातील सरकार पडणार का? असं विचारलं असता, येत्या १५ दिवसांत सर्वांना सर्वकाही समजेल, असं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.यावेळी बोलताना त्यांनी अतिक आणि अश्रफ अहमद यांच्या हत्येवरून योगी सरकारवर टीकास्र सोडलं. एकीकडे गुन्हेगारांना कायद्याने आळा घालायचा नाही आणि दुसरीकडे त्यांना गोळ्या घालण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकारची बंडखोरी बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे,असं ते म्हणाले.दरम्यान, काल जम्मू-कश्मीरी चे माजी राज्यपाल यांनी पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते .याबाबतही प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं सत्यपाल मलिक आत्ता बोलले आहेत पण मी हे सर्व त्याच वेळी बोललो होतो ज्या गाडीत स्फोट झाला त्या गाडीला संरक्षण नव्हते ही माहिती मला मिळते तर लष्कराला, सरकारलाही मिळू शकते पण सरकारला राजकारण करायचे होते. दहा गाड्यांच्या ताफ्या बद्दलची साधी माहिती कॉन्स्टेबलला होती .ती बाब राज्यकर्त्यांना कशी माहिती नसवी त्यामुळे त्यांची साधी चौकशी सुद्धा झाली नाही. राजकारणासाठी या जवानांचा बळी दिलाय का असा प्रश्न मी आजही उपस्थित करतो असे त्यांनी नमूद केल.
15 दिवस थांबा राज्याच्या राजकारणात दोन मोठे बॉम्बस्फोट होतील - प्रकाश आंबेडकर...
Hanuman Sena News
0
Post a Comment