बुलढाणा: जिल्ह्यातील नागणगाव ग्रामपंचायतचा तुघलकी कारभार उजेळात आला असून ज्या चिमुकल्यांसाठी शासनाने अंगणवाडीचे बांधकाम केले त्याच अंगणवाडीच्या इमारतीत ग्रामपंचायत चालवली जात असल्याचा स्पष्ट झालाय. हा प्रकार मागील सात ते आठ महिन्यापासून सुरू असून अंगणवाडीत जाणारी चिमुकले मात्र कधी शाळेच्या बाहेर ओरंड्यात तर कधी दुसऱ्या अंगणवाडीत बसवले जात असल्याची माहिती तिथल्या स्थानिकांनी सांगितले आहे. वर्गात एकूण 60 विद्यार्थी असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसायला जागा नीट पुरत नाही.ग्रामपंचायतीचा कारभार अंगणवाडी चालवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. एकाच वर्गात 60 विद्यार्थी असल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. हा सगळा प्रकार तिथल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या मर्जीनुसार सुरू आहे. अंगणवाडी ग्रामपंचायत कशी काय सुरू केली असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तक्रार केल्यानंतर ग्रामसेवक पुढच्या कामाला त्रास देईल यामुळे नागरिक तक्रार करण्यास घाबरत आहे.याविषयी ग्रामसेवकांना विचारणा केली असता ग्रामसेवक म्हणतात की आम्ही या खोलीचा वापर फक्त बसण्यासाठी करतो मात्र कारभार करत नाही .आणि बाहेर नावही अंगणवाडी लिहिलेला आहे मात्र ग्रामपंचायतीचे सर्व साहित्य संगणक ,खुर्ची, टेबल, कपाट सर्व काही ऑनलाईन कामे सुद्धा अंगणवाडीतच केली जातात.अशी माहिती मिळाली. गजानन बोडखे ग्रामसेवक नागणगाव यांच्यावर आता कारवाई कोण करणार आणि चिमुकल्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी कोण घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीची मदत केली जात आहे .त्याचबरोबर चांगला शिक्षण मिळावं यासाठी वेगवेगळ्या योजनांचा आयोजन केलं जात आहे. परंतु सध्याचा प्रकार उघडकीस असल्यामुळे गावकरी चिंतेत आहेत.
अंगणवाडीवर ग्रामपंचायतचा कब्जा, ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे चिमुकल्यांना बसवलं जातय व्हरांड्यात...
Hanuman Sena News
0
Post a Comment