बुलढाणा: सुमारे 121 वर्षाची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रेमध्ये तीन वर्षानंतर प्रथमच निर्बंध मुक्त पाच टन नारळाची हजारो लोकांच्या उपस्थितीत 6 मार्च रोजी होळी करण्यात आली गेले तीन वर्ष कोणाच्या साथीमुळे निर्बंध असल्यामुळे सैलानी यात्रा भरली नव्हती राज्यसह देशातील काही भागात सैलानी यात्रा आणि सैलानी दर्गा हा हिंदू मुस्लिम भाविकांची आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे तीन वर्षानंतर ही यात्रा भरत असल्याने हजारोंच्या संख्येत भाविक सैलानी यात्रेत आलेले आहेत. नारळाच्या होळीपासून खऱ्या अर्थाने सैलानी यात्रेला सुरुवात होते दरम्यान 6 मार्च रोजी सैलानी येथे शेख रफिक मुजावर ,शेख शफिक मुजावर, शेख जहीर मुजावर, शेख चांद मुजावर, शेख नई मुजावर यांनी पारंपारिक पद्धतीने धार्मिक विधी करून दुपारी ही नारळाची होळी पेटवली यावेळी या नारळाच्या होळीत अंगावरील कपडे नारळ टाकण्याची जुनी असलेली परंपरा पाहता अनेक भाविकांनी यंदाही तसेच केले सोबतच या होळीला भाविकांनी प्रदक्षिणाही घातली. दरम्यान ढगाळ वातावरण असल्याने यावेळी भाविकांची संख्या तुलनेने कमी दिसून आली यात्रेमध्ये वर्तमान स्थिती जवळपास एक लाख पेक्षा अधिक भाविक असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तीन वर्षानंतर यंदा ही यात्रा भरत आहे त्यामुळे मराठवाडा, दक्षिण भारत, गुजरात ,राजस्थान, मध्यप्रदेश येथील भाविक सैलानी मध्ये दाखल झालेले आहेत.होळी पेटविलेल्या परिसरातील गर्दी पाहता येथे पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता होळी जवळ अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी तसेच एस डी पी ओ सचिन कदम तहसीलदार रुपेश खंदारे ठाणेदार राजवंत आठवले गटविकास अधिकारी सविता पवार विस्तार अधिकारी डी एम जाधव एम आर गवते नितीन पाटील सुजित हिवाळे उपस्थित होते.
नारळाच्या होळीपासून खऱ्या अर्थाने सैलानी यात्रेला सुरुवात...
Hanuman Sena News
0
Post a Comment