मलकापूर प्रतिनिधी,
नागेश सुरंगे
मलकापूर :- दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या दिव्यांगांनकरीता काम करणाऱ्या फाऊंडेशनची दि 5-3-2023 रोजी मलकापूर विश्राम गृहात बैठक संपन्न झाली या बैठकीत फाऊंडेशन च्या पुढील कामकाजाबाबत चर्चा होवून नविन नियुक्या जाहीर करण्यात आल्या फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश भाऊ चोपडे यांनी महाराष्ट्र प्रदेश सल्लागार म्हणून श्री पंकज मोरे यांना नियुक्ती पत्र देवून नियुक्त केले तसेच पत्रकार नागेश सुरंगे यांची बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली याबाब नवनियुक्त पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देवून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना पंकज मोरे म्हणाले दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशन च्या माध्यमातून अपंगांना सर्वोतोपरी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच जिल्हाध्यक्ष सुरंगे यांनी सर्वाना सोबत घेऊन दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यास कटीबद्ध असल्याचे सांगितले यावेळी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष निलेश भाऊ चोपडे, सचिव शेख रईस, कोषाध्यक्ष संतोष गणगे, जिल्हासचिव शरद खुपसे, वाघुड गाव प्रमुख अशोक सनिसे, सदस्य अंकित नेमाडे, राजीव रोडे, प्रकाश वाघ, संजय रायपुरे, विकास सावळे, अनिल खोलगळे, एजाज खान ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment