Hanuman Sena News

बुलढाणा शहरातील कॅफेंमध्ये चाललंय तरी काय?; युवकांसह या आक्षेपार्ह वस्तूही सापडल्या...






बुलढाणा : बुलढाणा शहरातील विविध कॅफेंमध्ये द्वार बंद सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. काही महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी या कॅफेंचा गैरवापर करत असतात. असा धक्कादायक प्रकार बुलढाणा शहरात उघडकीस आला आहे. सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते. बुलढाणा शहरात ठिकठिकाणी कॉफी कॅफे थाटण्यात आले आहेत. या कॅफेमध्ये द्वारबंद कॅबिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या द्वार बंद कॅबिनचा काही महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी गैरफायदा घेतात. अशी तक्रार सकल मराठा समाजाकडून करण्यात आली होती. त्यानंतर बुलढाणा शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाई करण्यात आली.यात तब्बल 15 कॅफेंवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. यावेळी अश्लील चाळे करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एका कॅफे मालकावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या तक्रारीनंतर बुलढाणा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कंडोमची पॉकीटही सापडली आहेत. यात विशिष्ट अशा कॅबिन बनवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कपलसाठी अंधार असतो जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे कॅफे आहेत शाळकरी मुले मुले आणि अल्पवयीन सुद्धा असतात अशी माहिती ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली बुलढाणा शहरात असे काही कॅफे आहेत याची कल्पना प्रशासनाला नव्हती असे नाही पण त्याकडे दुर्लक्ष केले जात होते तक्रार केल्यानंतर पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली यात कंडोमची पाकीट सापडले ही धोक्याची घंटा समजली जात आहे कॅफेच्या नावावर येथे आणखी काय काय चालते याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली त्यानुसार शहरातील पंधरा कॅफेवर तपासणी करण्यात आली डिबी पथक आणि पोलीस यांच्या वतीने करण्यात आली यात कॅफेमध्ये गैरशिस्त वर्तन करताना मुलं मुली दिसले सहा जणांवर कारवाई करण्यात आली नेव्हीगेटर या कॅफे विरोधात गुन्हा दाखल केला आहे आरोपीला अटक केली आहे परवानाच्या अटी शर्ती बाबत तपासणी करण्यात येईल स्थानिक प्रशासनाला अवगत केले जाणार आहे वारंवार तपासणी करावी नियमाचे पालन करत नसतील तर त्यांचा परवाना रद्द केला जाईल.

Post a Comment

Previous Post Next Post