मुंबई, 24 मार्च : महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात यंदा प्रथमच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सांगली येथे ही स्पर्धा पारपडली असून या स्पर्धेत प्रतीक्षा बागडी हिने अंतिम लढत जिंकून पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रतीक्षा बागडी हिने वैष्णवी पाटील हिला चितपट केले.पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे तर्फे यंदा प्रथमच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 23 आणि 24 मार्च दरम्यान यास्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची अंतिम लढत सांगलीची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील यांच्यात पारपडली. कधीकाळी दोघी एकाच रूममध्ये राहत होत्या. तेव्हा मैत्रिणींमधील या लढतीची उत्सुकता सर्वांमध्ये होती अखेर प्रतीक्षा बागडी वैष्णवी पाटीलला चितपट करून ही स्पर्धा जिंकली.स्पर्धेच्या उपांत्य लढतीत प्रतीक्षा बागडी हिने कोल्हापूरच्या अमृता पुजारीवर मात केली होती. प्रतीक्षाने 9-2 अशा गुण फरकाने अमृताचा पराभव करून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.सांगलीच्या तुंग गावची असलेली प्रतीक्षा बागडी ही 21 वर्षांची असून ती वसंत कुस्ती केंद्र सांगली इथं सराव करते. राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने पदके पटकावली आहेत.खेलो इंडियामध्ये तिने रौप्य पदक जिंकल होतं. तर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ गटात रौप्य पदकावर नाव कोरल होतं. तर आता तिने महिला महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्याने तिचे सर्व स्थरातुन कौतुक होत आहे
सांगलीच्या लेकीने नाव काढलं! प्रतिक्षा बागडी ठरली महीला महाराष्ट्र केसरी...
Hanuman Sena News
0
Post a Comment