पुणे: पवार नावाची कीड महाराष्ट्राला लागली आहे. ती मुळापासून काढून टाकावी लागेल, अशी जहरी टिका भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी उत्तर दिलं आहे. अशातच आता एका माजी सैनिकाच्या मुलानेदेखील गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पडळकरांविरोधात पुण्यात बॅनरदेखील लावले आहेत.माजी सैनिक सूर्यकांत लालाजी पवार यांचे पूत्र माधव उर्फ नितीन सूर्यकांत यांनी पुण्यात बॅनर लावले आहेत. या बॅनरवरून त्यांनी पडळकरांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांना एक सवालदेखील केला आहे. या बॅनरवर लिहिलं आहे की, पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड? गोपीचंद पडळकरांचा निषेध. यावर पुढे लिहिलं आहे की, माजी सैनिक सूर्यकांत लालाजी पवार यांनी भारतीय सैन्यात देशसेवा केली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते सहभागी झाले होते. देशासाठी प्राण हातावर घेऊन लढणारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड? आमदार गोपीचंद पडळकर आम्ही पवार कुटुंबीय तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही.दरम्यान पडळकर यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील उत्तर दिलं आहे मिटकरी यांनी एक ट्विट केला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेला बाबासारखा आहे पवाराचं नुसतं नाव जरी ऐकलं की गोप्याच्या *** आग लागली म्हणून समजा. याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एक दिवस आग लावून त्याच भट्टीवर *** शेकत आनंद घेईल.
आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड? माझी सैनिकाच्या मुलाचा गोपीचंद पडळकरांना सवाल, पुण्यात लावले बॅनर...
Hanuman Sena News
0
Post a Comment