Hanuman Sena News

भरधाव ट्रकच्या जबर धडकेत माकोडी येथील दूचाकीस्वार ठार...


माकोडी: भरधाव ट्रकच्या जबर धडकेत मेंदूचा चेंदामेंदा होऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली विनोद नामदेव इंगळे (वय 60) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे 25 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता टीएस -01 युसी 5704 क्रमांकाचा ट्रक माकोडी येथे सिमेंट खाली करून मलकापूरकडे जाण्यास निघाला होता दरम्यान मलकापूर वरून माकडीकडे जाणाऱ्या दुचाकी ला सदर ट्रकने जबर धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की या धडकेत दुचाकीचा अक्षरशः चुराडा होऊन दुचाकी वरील विनोद नामदेव इंगळे यांच्या मेंदूचा चेंदामेंदा झाला तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला घटनेची माहिती मिळताच धामणगाव बढे येथिल ठाणेदार सुखदेव बोरकडे साहेब यांनी सहकारी पोलीस अंमलदारासह खामगावच्या दिशेने पाठलाग सुरू केला .तसेच खामगाव पोलिसांना उपरोक्त घटनेची माहिती देऊन नाकाबंदी करण्यास सांगितले मात्र पोलिसांना ट्रक पकडण्यात यश आला असून चालक फरार होण्यात यशस्वी झाला याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सुखदेव बोरकेडे हे करीत आहेत मृतकाच्या पश्चात पत्नी एक गतीबंद मुलगा व दोन मुली असा आप्तपरिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post