मुंबई - शिवसेनेतील बंडाळीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यातच, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल दिल्यामुळे ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. खासदारसंजय राऊत सातत्याने शिंदे गटावर तोफ डागत आहेत. त्यावरुन, शिंदे गटाचे आमदारही पलटवार करताना संजय राऊतांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर आमच्यावर टीका करावी, असे म्हणतात. त्यातच, आता शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन खासदार संजय राऊत यांना हटवण्यात आल्याची माहिती आहे.शिवसेनेतील बंडाळीनंतर ४० पेक्षा जास्त आमदार शिंदेसोबत गेले. त्यानंतर, लोकसभेतील १८ पैकी १३ खासदारही शिंदे गटात सामिल झाले. त्यामुळे, शिंदे गटाकडून संसदेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. आता, खासदार संजय राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, यांसंदर्भात काही दिवसांपूर्वीच खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकारांना तशी माहितीही दिली होती. त्यानुसार, आज ही निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवल...
Hanuman Sena News
0
Post a Comment