Hanuman Sena News

तातडीने कारवाई करण्याची गरज काय? माहीम मजार प्रकरणावरून अबु आझमींचा सरकारला सवाल...




















मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडवा मेळाव्यादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झालं असल्याचा एक व्हिडीओ दाखवला होता. समुद्रात अनधिकृतपणे दुसरा हाजीअली दर्गा बांधत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. एका महिन्याच्या आत हे बांधकाम हटवलं नाही तर आम्ही तिथे मोठं गणपती मंदिर बांधू असा इशारादेखील राज यांनी यावेळी दिला होता. त्यानंतर याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून महापालिकेकडून हे बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे.या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना विचारले असता आझमी म्हणाले की, “इतक्या त्वरित कारवाई करण्यापेक्षा एकदा त्यांना नोटीस पाठवायला हवी होती. त्यांच्याकडे कागदपत्रं मागवायला हवी होती. ती तपासायला हवी होती. ते बांधकाम अनधिकृत आहे की अधिकृत आहे हे तपासायला पाहिजे होतं. एका मिनिटात तिथे जाऊन कारवाई करणं म्हणजे हे ध्रुवीकरण आहे. हा मुद्दा दुसऱ्या कोणाकडे जाऊ नये यासाठी ही कारवाई इतक्या तातडीने करण्यात आली.” माहीम जवळ समुद्रात अनधिकृत पणे दुसरा हाजी अली दर्गा बांधत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यात केला.या अनधिकृत बांधकामाची एक चित्रफितही त्यांनी भाषणावेळी दाखवली होती .ही मजार अनधिकृत असून ती तोडण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती तसेच हे बांधकाम तोडलं नाही तर आम्ही तेथे सर्वात मोठे गणपतीचे मंदिर उभारू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाने काल रात्रीच आदेश काढून हे बांधकाम काढून टाकण्याबाबत पावले उचलली सकाळी आठ वाजता पोलिस आणि पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या पथकाची मदत घेत अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post