भंडारा : 8 मार्च भंडारा जिल्ह्यात विदारक घटना घडली आहे. वडिलांचं पार्थिव घरी असताना मुलीने दहावीचा पेपर देण्याचं धैर्य दाखवलं आहे. लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील प्राची राधेश्याम सोंदरकर असे विद्यार्थीनीचे नाव आहे. वडिलांचा भीषण अपघात झाल्यानंतर उपचारादरम्यान निधन झाले. अशावेळी मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा परिस्थितीत करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दहावीची परीक्षा देण्याचं धैर्य या मुलीने दाखवलं. तिच्या या धाडसाचं सर्वजण कौतुक करत आहेत.प्राची राधेश्याम सोंदरकर हिच्या वडिलांचा गत महिन्यात महाशिवरात्रीच्या दिवशी लाखांदुरवरून स्वगावी सोनीकडे जात असताना मेंढा फाट्याजवळ अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत अपघात झाला होता. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. अपघातजनक राधेशाम यांना दोन मुली असून, मोठी मुलगी दहावीत तर लहान मुलगी सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे. दरम्यान वडील राधेशाम यांच्यावर नागपुरात उपचार सुरू असताना तोंडावर दहावीची परीक्षा होती. त्यामुळे प्राची हिने दहावीच्या परीक्षेची तयारी अविरत सुरु ठेवली. 6 तारखेला इंग्रजीच्या पेपरची तयारी करत असताना अचानक फोन आला की तुझे बाबा राहिले नाही. वडिलांच्या मृत्यूची बातमी कानावर पडतात मुलगी निशब्द झाली वडिलांच्या मृत्यूची बातमी मोहल्यात वाऱ्यासारखी पसरली शेजारी एकवटले बघता बघता घरासमोर गर्दी झाली. शोकाकुल वातावरण पसरला घरच्यांनी तर हंबरडा फोडला मात्र प्राचीने वडिलांच्या मृत्यूचे दुःख लपवून ठेवत न रडता आपले ध्येय गाठण्याचा प्रण करत तयारी करून आदर्श इंग्लिश हायस्कूल देसाईगंज वडसा येथील परीक्षा केंद्र गाठले प्राचीच्या हायस्कूलचे प्राध्यापक यांना घटनेची माहिती झाल्याने त्यांनी प्राचीला पेपर सोडवण्यासाठी धीर देऊन वडिलांची स्वप्नपूर्ती करण्यास सांगितली प्राचीने देखील घरी वडिलांचा अंत्यविधी असताना तिने धीर्याने इंग्रजी विषयाची परीक्षा दिली आहे प्राचीच्या या धाडसाच्या निर्णयामुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे
काळजावर दगड ठेवून लेक दहावीच्या परीक्षेला; घरी बापाचा मृतदेह, भंडाऱ्याच्या प्राचीचं धैर्य...
Hanuman Sena News
0
Post a Comment