मालेगाव: ठाकरे गटाची प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील सभेत भाजपा सदस्य गटावर जोरदार हल्लाबोल केला भाजपा शिंदे गटातील जागा वाटपावरून उद्धव ठाकरेंनी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व निशाणा साधला बावनकुळे साहेब तुमच्या नावावर किमान 52 जागा तरी मेंदू गटाला द्या त्यांची काहीतरी लायकी ठेवा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी टोलेवाडी केलीउद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले आताचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आहे त्याबाबत मी सांगितलं की आम्ही मिळणे गटाला फक्त 48 जागा देणार आहोत पण साहेब च्या नावावर किंवा 52 जागा तरी द्या त्यांची काहीतरी लायकी ठेवा एवढ्या असंख्य जिवंत माणसाचं प्रेम करून ते तुमच्या डोक्यात घुसलेले सगळे मुले आहेत त्यांना तुम्ही 48 जागांमध्येच आटोपणार का? उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी महाराष्ट्रातील भाजपाला विचारतोय, तुम्ही (भाजपा) मिंध्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार आहात का? असं असेल तर आम्ही मिंध्यांना नेता मानून निवडणुका लढणार आहोत, हे भाजपाने जाहीर करावं. जर भाजपाला असं वाटत असेल की, आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. तर तुमचे ५२ नव्हे तर १५२ कुळं खाली उतरली तरी कुणी शिवसेना तोडू शकत नाही. प्रयत्न करून बघा.“मी तर म्हणतो, आता तातडीने निवडणुका घ्या. हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मतं मागा. मी माझ्या वडिलांच्या नावाने मते मागतो. बघुया महाराष्ट्र कुणाला कौल देतो. स्वत:कडे कर्तृत्व शून्य असताना ते गद्दारी करून मुख्यमंत्री झाले. त्यांना अजूनही माझ्या वडिलांचं नाव वापरावं लागतंय, हा तुमचा पराभव आहे. ज्या शिवसेनेनं तुम्हाला राजकारणात जन्म दिला. त्या राजकारणातल्या जन्मदात्या आईच्या कुशीवर वार करणारे हे सगळे चोर धनुष्यबाण घेऊन फिरत आहेत” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकास्र सोडलं.
Post a Comment