मलकापूर: दिव्यांग लाभार्थ्यांना ५% निधीचे त्वरित वाटप करावे व नगरपरिषद येथे दिव्यांगांसाठी लिफ्टची (Lift) व्यवस्था करण्यात यावी. याकरिता दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूरच्या पदाधिकाऱ्यांनी न.प.मलकापूरचे मुख्याधिकारी व प्रशासक तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले.दिलेल्या निवेदनात नमुद आहे की दिव्यांग लाभार्थ्यांना 5% निधीचे त्वरित वाटप करण्यात यावे तसेच दिव्यांग बांधवांना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती पायऱ्यावरून ये-जा करण्यासाठी त्रास होत असतो. बऱ्याच वेळा त्यांचे पळझड होते त्यासाठी न.प.प्रशासनाने येण्या -जाण्यासाठी दिव्यांग बांधवांना लिफ्टची सुविधा उपलब्ध करून द्यावी याबाबत नगर परिषद मलकापूरचे प्रशासक तहसीलदार साहेब तसेच नगर परिषद मलकापूरचे मुख्याधिकारी यांच्यासोबत तोंडी चर्चा करण्यात आली होती.तेव्हा आश्वासन देण्यात आले होते,की लिफ्टचे काम लवकरच मार्गी लावण्यात येईल परंतु अद्याप पर्यंत त्यावर कुठलेही कारवाई करण्यात आलेली नाही.सदर लिफ्टचे काम त्वरित करण्यात यावे आणि 5% निधीचे ही त्वरित वाटप करून दिव्यांग बांधवांना दिलासा द्यावा याकरिता निवेदन देण्यात आले.तसेच मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन द्वारे देण्यात आला.त्यावेळी उपस्थित दिव्यांग फाउंडेशन मलकापूरचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळु चोपडे,सहसचिव संतोष गणगे, महाराष्ट्र सल्लगार पंकज मोरे, जिल्हाअध्यक्ष नागेश सुरंगे, जिल्हा महासचिव राजीव रोडे,सदस्य अंकित नेमाडे, संतोष बोरले(santy), गफूर चव्हाण, गजानन बोरसे, अनिल झनके,प्रहार तालुकाअध्यक्ष राहुल तायडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांना 5% निधी चे त्वरित वाटप व्हावी तसेच नगर परिषद मलकापूर येथे दिव्यांगासाठी त्वरित लिफ्ट ची व्यवस्था करण्यात यावी...दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन
Hanuman Sena News
0
Post a Comment