पुणे : महाराष्ट्राच्या लालपरीच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक एसटीचं स्टिअरिंग हाती घेणार आहेत. यासाठी पुणे विभागात 15 महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे. यातील सहा महिलांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील महिला कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण करून त्या मार्च अखेरपर्यंत सेवेत रुजू होणार आहेत.स्त्री ही कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. पुरूषाच्या बरोबरीने ती सगळीकडे उभी राहते. वेगवेगळ्या क्षेत्रात पुरूषांच्या पुढे जाऊन नाव लौकिक मिळवत आहेत. मात्र, काही क्षेत्र अजूनही आहेत जिथे पुरूषांचे वर्चस्व कायम आहे आणि ते क्षेत्र म्हणजे एसटी. महाराष्ट्राच्या एसटीमध्ये आजवर एकही महिला ड्रायव्हर नव्हती. आता एसटीचे सारथ्यही महिला करणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत येणाऱ्या पुणे विभागात एकूण 17 महिलांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यातील सहा महिलांनी पहिल्या टप्प्यातील 3 हजार किलोमीटरचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 27 डिसेंबरपासून या सहा महिला एसटी चालकांचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षण मार्चअखेर पूर्ण होईल आणि लालपरीचे स्टेअरिंग या महिलांच्या हाती येईल.एसटी चालक होण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहन परवाना आवश्यक असतो.. या महिलांच्या वाहन परवान्यांची पूर्ण प्रकिया ही एसटी महामंडळाकडूनच पूर्ण करण्यात आली आता हे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण करून या महिला एसटी चालकांची चाचणी होईल आणि यानंतर आजच्या फेरीस या महिला लाल परीतून प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी सज्ज होणार आहेत या सेवेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांचे बस चालवण्याचा प्रशिक्षण काळ सोपान होत या महिला वाहकांचे शिक्षण ऐकून तुम्ही थक्क व्हाल कोणी बँकेत सेल्स मॅनेजर होते कोणाचे एम एस डब्ल्यू झाले आहे तर कोणी इंजीनियरिंग पूर्ण करून सेवेत रुजू झाले आहेत राज्यातील 21 आगारात 206 महिला चालक पात्र आहेत पुणे नागपूर गडचिरोली कोल्हापूर भंडारा नाशिक गडचिरोली जळगाव नाशिक औरंगाबाद अमरावती धुळे सांगली अशा एकूण 21 आजारात सरळ सेवा भरती करण्यात आली यानंतर राज्यात 35 महिला मार्च अखेरपर्यंत एसटी महामंडळात चालक म्हणून रुजू होणार आहेत महिलांना चालक म्हणून तयार केले आहे सुरेश हिडगे आणि खळदकर सरांनी घडवले आहे असे महिला चालक सांगतात.
लाल परीचे स्टेरिंग आता महिलांच्या हाती ; पहिल्यांदाच राज्यात महिला चालवणार ST बस...
Hanuman Sena News
0
Post a Comment