Hanuman Sena News

विश्व हिन्दू परिषद मातृशक्ति द्वारा मातृ-पितृ पूजन दिवस साजरा...









मलकापुर : आई बाबा या दोन शब्दांचं महत्व आपल्या आयुष्यात इतके आहे  की सांगता येणार नाही,कारण आई - वडील हे फक्त शब्द नाहीयेत तर आपले आयुष्य आहे.14 फेब्रुवारी रोजी साऱ्या विश्वात 'व्हॅलेंटाईन डे' केला जातो पण  ही विदेशी विकृती आहे आपल्या भारत देशात या तारखेस मातृ- पितृ पूजन दिवस साजरा केला जातो या अनुसंघाने समाजात या दिनाची व आपल्या संस्कृती जनजागृती व्हावी या उद्देशाने विश्व हिन्दू परिषद, मातृशक्ति द्वारे भाऊ साहेब मेरेकर यांच्या श्री राम मंदिर मलकापूर येथे मातृ पितृ पूजन दिनाचे  आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरवात विहिप मलकापुर नगर  अध्यक्ष दिलीप पाटिल, मातृशक्ति तालुका संयोजीका अश्विनी ताई काटे, मातृशक्ति सत्संग संयोजीका भारती ताई वैष्णव यांच्या द्वारे भारत माताचे पूजन  माल्या अर्पण व दीप प्रज्वलन शंखनांद करुन करण्यात आले.यावेळी मातृशक्ति मलकापुर प्रखंड संयोजीका काटे ताई यांनी उपस्थित पालक व पाल्या यांना मातृ-पितृ यांचे महत्व बद्द्ल सांगितले की 14 फेब्रुवारी, 'व्हॅलेंटाईन डे' ला लाखो प्रेमी युगुल प्रेमाच्या बंधनात अडकतात. वासनेमुळे ते आपल्या चांगल्या-वाईटाचा विचार करू शकत नाहीत, आपल्या आयुषातील अमूल्य वेळ जो अभ्यासाला दिला पहिजे तो विदेशी संस्कृती चे आचरण करुण  त्यांच्या विळख्यात सापडून तरुण पीढी आपले भविष्य खराब करत आहे म्हणून या दिवशी त्यांनी अशा व्यक्तीचा विचार करावा ज्यानी आपले भले पाहन्या करीता दिवस रात्र एक केली असे आपले  आई  वडील या दिवशी 'मातृ-पिता पूजन' कार्य-भावनेच्या दुष्कृत्यांपासून दूर घेऊन उज्ज्वल भविष्य, चांगले चारित्र्य, सद्गुणयुक्त जीवन देईल या करीता प्रत्येक कुटुंब मध्ये साजरा करावा आपल्या जीवनात आनंद आणण्यात आणि समस्या सोडवण्यात पालकांचा सर्वाधिक वाटा असतो.  कारण भारतात आई-वडील आपल्या मुलांचे सर्व प्रकारे पालनपोषण करतात.
 आपल्या पालकांनी आपल्यापेक्षा जास्त वर्षे जगात घालवली आहेत, त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा खूप जास्त आहे, ज्याची आपण आपल्या छोट्या अनुभवाशी तुलना करू शकत नाही.  हा अनुभव त्यांच्याकडून आपल्याला सहज मिळतो.त्यामुळे ज्याला आपली प्रगती हवी आहे, त्या व्यक्तीने आई-वडील आणि शिक्षक यांचा आदर आणि आज्ञा पाळली पाहिजे.भारती ताई यांनी कार्यक्रमाच्या प्रस्थावनेत आई म्हणजे ती जिने फक्त जन्मचं नाही तर हे आयुष्य दिलं हे विश्व दाखवले,आणि बाबा ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली असे आई बाबा अगदी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत ते आपल्यासाठी झटत आहे नको ते कष्ट,हव्या त्या नको त्या सर्व गरजा पुरवत आहे  अश्या आपल्या आई वडील यांचे पूजन  आपन  दररोज केले पाहिजे  असे मत वक़्त केले.उपरांत उपस्थित सर्व पाल्य यांनी आप आपल्या आई  वडील यांचे पूजन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मलकापुर प्रखंड मंत्री सुयोग शर्मा तर कार्यक्रमास उपस्थित पाल्य व बालक वर्ग तसेच मेरेकर ताई यांचे आभार नगर  अध्यक्ष दिलीप पाटिल यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post