Hanuman Sena News

देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक गौप्यस्फोठ; त्या शपथविधीबाबत शरद पवारांशी चर्चा झाली होती..




मुंबई-२०१९ मध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेअजित पवार यांनी पहाटे सरकार स्थापन केले होते. हे सरकार फक्त काही तासच चालले होते, यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.  '२०१९ मध्ये आम्ही घेतलेल्या शपथविधी संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळाच खळबळ उडाली आहे.  देवेंद्र फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. '२०१९ मध्ये आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. या सरकार संदर्भात सर्व चर्चा झाल्या होत्या. पण, ऐनवेळेला आमच्यासोबत विश्वासघात करण्यात झाला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला आणि दुसरा विश्वासघात पवारांनी केला असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.राज्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्यांची गर्दी; आदित्य ठाकरेंची टीका 'महाविकास आघाडी सरकार मला तुरुंगात टाकू शकले नसते, पण त्यांनी मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मला तुरुंगात टाकण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सुपारी दिली होती, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी कधीही पोलीस विभागात अपमानीत केल नाही. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांच माझ्याबाबतीत प्रेम होते, त्यामुळे त्यांनी केलेल्या प्रयत्नांची मला माहिती मिळायची. त्यांनी मला तुरुंगात टाकण्यासाठी जंग जंग पछाडले, असा आरोपही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.'माझ्यासोबत दोनवेळा विश्वासघात झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या आणि निवडून आले. प्रचार सभेत पंतप्रधान मोदीजी यांनी देवेंद फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा उध्दव ठाकरे टाळ्या वाजवत होते.पण ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोन घेतला नाही माझ्याशी चर्चा केली नाही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत निघून गेले त्यामुळे एक प्रकारे विश्वासघात त्यांनी केला आहे असेही देवेंद्र फडवणीस म्हणाले. 2019 च्या वाढदिवसाच्या नेते अजित पवार यांनाही प्रश्न विचारण्यात आले होते पण यावेळी अजित पवार यांनी या शपथविधी संदर्भात बोलण्यास नकार दिला होता मी या विषयासंदर्भात बोलणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post