Hanuman Sena News

"छत्रपतींच्या मेळाव्यात" शिवजयंती महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते खा. अमोल कोल्हे यांच्या हस्ते...


बुलढाणा: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास रूपेरी पडद्यावर जिवंत असा करण्याचे काम डॉ.अमोल कोल्हे यांनी केले "स्वराज्य रक्षक संभाजी" च्या माध्यमातून घराघरात छत्रपती संभाजी महाराज व शिवराय पोहोचवण्याची श्रेय खासदार अमोल कोल्हे यांना दिले जाते त्यांना पाहण्याची जणू सवय दर्शकांना झाली आहे रुपेरी पडद्यावरील हा रांगडा कलावंत बुलढाणा करांना प्रत्यक्ष पाहता येणार असून 17 फेब्रुवारी रोजी ते शिवजयंती महोत्सवाचे उद्घाटन करणार आहे बुलढाणा शहरात साजरी होणारी शिवजयंती आगळीवेगळी विक्रम प्रस्थापित करणारी ठरत आहे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोन चिंचोले यांनी तर वाहून घेतल्यागत कामाला सुरुवात केली आहे सर्व टीम त्यांना सहकार्य करीत असून हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना तितकाच उत्कृष्ट प्रतिसाद बुलढाणा करांचा मिळत आहे शहरातील डॉक्टर्स व्यापारी मुस्लिम धर्मीय आणि शिवप्रेमी असा हा "छत्रपतींचा मेळा" भरणार असून डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता उद्घाटन होत आहे. शिवकालीन शास्त्राचे प्रदर्शन गड किल्ले चित्र प्रदर्शन व्याख्यान पोवाडे शिवज्योत सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य दिव्य शोभायात्रा यंदाच्या शिवजयंतीला लाभला आहे वेगवेगळ्या समित्यांची निवड ही करण्यात आली आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव, डॉक्टर राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड ,आमदार धीरज लिंगाडे, जिल्हाधिकारी तुम्मोड साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड साहेब,जिल्हा परिषद मु का अ भाग्यश्री विसपुते आदींसह राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती राहणार आहे राज्यात शिवरायांचा आगळावेगळा प्रयोग बुलढाण्यातून सुरू झाला आहे लोकोत्सव अभिनेते खा. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीने यंदा उंचीवर पोहोचवणार आहे

Post a Comment

Previous Post Next Post