काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू अशी ओळख असणाऱ्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी निलंबित केले आहे. सभागृहाच्या कामकाजादरम्यान व्हिडिओ बनवणे काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांना महागात पडले आहे.उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी ही कारवाई केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पाटील यांच्या या कृतीवर आक्षेप घेतला होता. पाटील यांना या सत्रापुरते निलंबित करण्यात आले आहे.सोनिया गांधी यांच्या किचन कॅबिनेट मधील एक नेत्या अशीही पाटील यांची ओळख होती. युवा नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती. मात्र रजनी पाटील यांना संधी देऊन काँग्रेसने एका महिला नेत्याला संधी दिली होती. यापूर्वी त्या ११ व्या लोकसभेत बीडमधून खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या.राज्यसभेतील त्यांच्या कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट पदार्पण संसदपटूचा पुरस्कार देण्यात आला होता.
महाराष्ट्राच्या खासदार रजनी पाटील यांचे निलंबन;जगदीप धनखड यांची कारवाई...
Hanuman Sena News
0
Post a Comment