Hanuman Sena News

स्वाभिमानीचे आंदोलन चिघळण्याची शक्यता रविकांत तुपकरांच्या घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढला...







स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे आज 11 फेब्रुवारीला होणाऱ्या आंदोलन चांगले चिघळण्याची शक्यता आहे सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी आता टोकाची भूमिका घेतली आहे. एक तर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला जगू द्या ,नाहीतर आम्हाला आत्मदहन करू द्या. तेही करू देत नसाल तर, पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या घालून आम्हाला ठार करा. अशी भूमिका तुपकरांनी घेतली आहे. आज 11 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय मुंबईच्या ए आय सी पीक विमा कंपनीच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्याची घोषणा, तुपकरांनी केली आहे. दरम्यान तुपकर यांनी केलेल्या घोषणेमुळे संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तुपकर यांना नोटीस बजावली असली तरी तूपकर मात्र गेल्या चार दिवसापासून भूमिगत झाले आहे .मुंबई आणि बुलढाणा पोलीस तुपकर यांचा मार्गावर असले तरी तुपकर यांचा पत्ता मात्र अजूनही पोलिसांना लागलेला नाही बुलढाणा पोलिसांनी तुपकर यांच्या निवासस्थानी देखील बंदोबस्त तैनात केला आहे.आज हजारो शेतकरी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याने पोलिसांवरील ताण वाढणार आहे .स्वतः रविकांत तुपकर नेमके कुठे आंदोलन करणार याबाबत अनिश्चितता कायम आहे. सकाळी अकरा वाजता तूपकर थेट आंदोलनाच्या ठिकाणीच प्रकट होण्याची शक्यता आहे .हजारोंच्या संख्येतील शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्यासाठी पेट्रोल डिझेलच्या कॅन सोबत आणल्या तर प्रकरण नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागेल. एकूणच आंदोलन चांगले चिघळण्याची शक्यता असल्याने सगळ्यांचे लक्ष आंदोलनाकडे लागून आहे.

Post a Comment

Previous Post Next Post