Hanuman Sena News

अमरावती पदवीधर मतदारसंघाचा आज होणार फैसला !...




बुलढाणा: पाच जिल्ह्याच्या विस्तीर्ण असलेल्या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान झाले 2 फेब्रुवारी रोजी मतदान मतमोजणी सुरू होणार यंदाच्या निवडणुकीत घसरलेली मतांची टक्केवारी मतांचे संभाव्य विभाजन आणि पसंती क्रम कोणाच्या पथ्यावर पडतो याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यात 37 हजार 894 पदवीधर मतदार असून 30 जानेवारी रोजी 20 हजार 99 मतदारांनी मतदारांचा हक्क बजावला होता. यामध्ये 15 हजार 330 पुरुष आणि 4 हजार 769 महिलांनी मतदान केले पदवीधर मतदारसंघात 1 लाख 2 हजार 403 जणांनी मतदान केले होते मतदानानंतर पदवीधरांचा आमदार कोण या विषयावरती राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढविले जात आहेत. निवडणूक निकालानंतर विजयाचा जल्लोष होणार आहेत मात्र तो कोणाचा होईल आणि गुलाल कोणाचा उडेल याची उत्सुकता लावून राहिली आहे. प्रमुख पक्ष व प्रमुख उमेदवारांच्या समर्थक कार्यकर्त्याकडून विजयाचे दावे प्रती दावे करण्यात येत आहेत.त्यामुळे मतदाराचे काय होणार याविषयी त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख पक्षाचे पदाधिकारी व उमेदवार समर्थक रात्रीच अमरावतीला रवाना झालेले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post