Hanuman Sena News

नागपूर मधील विजयानंतर मिटकरींची फडणवीस- बावनकुळेंवर टोलेबाजी !










नागपूर: नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने भारतीय जनता पार्टीला जोरदार धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबोले यांनी भाजपाचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने विजय संपादन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.नागपूरमधील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नागपूरच्या स्थानिक राजकारणावरून समर्पक चारोळी शेअर करत भाजपाला खोचक टोला लगावला आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आगामी काळात महाराष्ट्रात भाजपाची धुरा नितीन गडकरी सांभाळतील का? असा सवाल मिटकरी यांनी विचारला आहे. दरम्यान त्यांनी भाजपाचा उल्लेख कमलाबाई असा केला असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही टोला लगावला आहे मिटकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की "नागपूरकर गाणार"... आज "कमळाबाई" जाणार... "बावन" कुळां चा उद्धार... काही दिवसात होणार... संघाच्या बागेत देवेंद्रजींची दरी... नितीनजी ठरतील का भावी "गड"करी ? पहिल्या फेरीत मतमोजणीत अडबाले १४०७१ गाणार यांना 6309 मते मिळाली अडबुले यांनी सात हजाराहून अधिक मतांनी विजय संपादन केला अडबुले यांनी पहिल्या फेरीत मतांचा कोठा पूर्ण करीत विषयावर शिक्कामोर्तब केले दहा वर्षापासून भाजपाकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकले नागपूर शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठित केली होती फडणवीस गडकरी यांनी भाजपा उमेदवार नागोराव गाणार त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या

Post a Comment

Previous Post Next Post