मलकापूर: रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान असे समजले जाते जिल्ह्यातील विविध रुग्णालयामध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढी मधील साठा कमी पडू लागला आहे तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने हनुमान सेना महाराष्ट्र राज्य मलकापूर यांच्यावतीने शिवजयंती निमित्त 19/02/2023 रोजी सकाळी 11:00 ते 2:00 भव्य रक्तदान शिबिर करण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी तालुक्यातील इच्छुक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सहकार्य करावे असे आव्हान हनुमान सेना संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ टप यांनी केले आहे कार्यक्रमाचे ठिकाण डॉ. मुरलीधर खर्चे मेमोरियल जीवन ज्योती ब्लड बँक मलकापूर येथे आयोजित केलेले आहे तरी इच्छुक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन रक्तदान करावे. व समाजासमोर एक आगळावेगळा उपक्रम राबवावा.
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त हनुमान सेने तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजन...
Hanuman Sena News
0
Post a Comment