स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सोयबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. १२ फेब्रुवारीला बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांच्या वेशात येत स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. याचे राज्यभरात पडसाद उमटले होते. पण, मंत्री गुलाबराव पाटील यांनी या आंदोलनाला नौटंकी म्हटलं होतं.शेतकऱ्यांचं हे आंदोलन नौटंकी आंदोलन आहे. आंदोलनाचे अनेक मार्ग आहे. आपणही आंदोलनं केली. पण, हे नौटंकी आंदोलन आपल्याला पसंत नाही,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली होती. त्यांच्या विधानाचा आता रविकांत तुपकर यांनी समाचार घेतला आहे.जामीनावर सुटका झाल्यानंतर रविकांत तुपकरांनी नागरिकांशी संवाद साधला. तेव्हा बोलताना रविकांत तुपाकर म्हणाले, “पोलिसांना ज्यांनी आमच्या अंगावर पाठवलं, त्यांच्या खुर्च्या येणाऱ्या काळात काढून घेतल्याशिवाय राहणार नाही; हा शेतकऱ्यांचा निर्धार आहे. खेटायचं असेल, रविकांत तुपकरशी मैदानात खेटावं.पोलिसांच्या आडून खेटू नये.“गुलाबराव पाटील आंदोलनाला नौटंकी म्हणत आहे. पण, गुलाबराव पाटीलांच्या भाषणात एक डायलॉग असतो, तो म्हणजे, ‘कतलीया कही कात बदल लेते हे, पुण्य के आड मे पाप बदलते है, पर कई लोग अपने बाप बदल लेते है’ अन् गुलाबराव पाटील गुवाहाटी ला गेले ते सांगतात मी नोटंकी आहे मग गुहाटी ला काय शेण खायला गेले होते का असा खोचक सवाल रविकांत तुपकर यांनी विचारला विरोधी पक्षात असताना गुलाबराव पाटील यांनीही आंदोलन केली पान टपरी चालवत असताना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मंत्री केलं त्यांच्याशी तुम्ही बेईमानी आणि गद्दारी केली व जिनके घर शीशे के होते है ,वे दुसरो के घर पर पत्थर नही फेका करते. तुम्ही ठाकरे घराण्याचे झाले नाही मग आम्हाला शिकवता का योग्य वेळी गुलाबराव पाटलांना उत्तर देणार असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.
माझ्या आंदोलनाला नौटंकी म्हणता ! मग गुवाहटीला काय शेण खायला गेले होते का?- रविकांत तुपकर...
Hanuman Sena News
0
Post a Comment