Hanuman Sena News

संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त शेगावात भक्तांची मांदियाळी...




शेगाव: १३ फेब्रुवारी म्हणजेच  श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिवस. शेगाव श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दुमदुमलेलं पाहायला मिळत आहे.फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश आणि गुजरात इथनंही आलेल्या पालख्या शेगावात दाखल झाल्या आहेत."श्री गजानन महाराज की जय" च्या जयघोषात अवघं शेगाव दुमदुमुन निघालं आहे.शेगावनिवासी संत श्री गजानन महाराजांना श्री दत्तगुरुंचे तिसरे रूप म्हणूनही ओळखलं जातं, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज आणि शिर्डीचे साई बाबा ही श्री दत्तांची पहिली दोन रुपं म्हमून ओळखली जातात. श्री गजानन महाराजांचे सर्वप्रथम दर्शन शेगाव मध्ये १३ फेब्रुवारी १८७८ रोजी झाले होते, महारांजांच्या जन्माचा कुठलाही पुरावा नाही, म्हणूनच १३ फेब्रुवारी हा दिवस श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो. श्री संत गजानन महाराज परमज्ञानी, अध्यात्मिक, महान योगी आहेत. मानवतेला सदाचार संपन्न करून महाराजांनी आपला अवतार ८ सप्टेंबर १९१० ला समाधी घेऊन संपवला. मात्र त्याआधी दोन वर्षांपूर्वीच महाराजांनी समाधीचा दिवस आणि समाधीची जागा भक्तांना सांगितली होती.श्री गजानन महाराज प्रकट दिन हा बुलडाण्यातल्या शेगाव इथं शुभ दिवसाच्या रुपात साजरा केला जातो. या दिवशी शेगाव इथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि श्री गजानन महाराजाच्या पादुकांचे पूजन केले जाते. महाराष्ट्रातील पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्री गजानन महाराज प्रकट दिन दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्रास्त अस्त होत असताना सातव्या दिवशी साजरा केला जातो. शेगावात गणगण गणात बोते चा गजर पाहायला मिळतो. या दिवशी संपूर्ण शेगावात पूजा,आरती,अभिषेक,पालखी, पारायण पाहायला मिळत लाखो भाविक आपल्या दिंड्या घेऊन शेगावात दाखल झाल्याने शेगावाला एका यात्रेच रुप आलेलं पहायला मिळालं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post