मोताळा: मोताळा येथील राहुल एकनाथ धनवटे ( 27 वर्षे ) तरुण गेले तीन वर्ष पुणे येथे कामाला गेला होता. कुटुंबाला हातभार लावणारा राहुल धनवटे या तरुणाचा काळाने घात केल्याची घटना घडली. अहमदनगर येथे जात असताना अहमदनगर कल्याण बायपास जवळ त्याच्या दुचाकी ला भीषण अपघात झाला. पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाऊन मोठा श्रीमंत होण्याचे स्वप्न असल्याचे त्याने बोलून दाखवले होते. अपघातात राहुलला आपला जिव गमावा लागला असून त्याचे ते शब्द अखेरचे ठरले. त्याच्या पाश्चात आई-वडील भाऊ बहीण पत्नी व मुले असा भला मोठा परिवार होता. राहुलचा अपघाती मृत्यूमुळे सर्वांच्या मनाला चटका लावणारा असल्यामुळे मोताळा शहरात व धनवटे परिवार, मित्रपरिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे तसेच राहुल धनवटे हा अण्णा भाई ग्रुपचा सभासद होता व अण्णा भाई धनवटे यांचा अत्यंत विश्वासू होता.तसेच त्याने सामाजिक कार्यामध्ये नेहमी पुढाकार घ्यायचा अशा या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण अण्णा भाऊ ग्रुपच्या सभासदांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.
काळाने घात केला! "भाऊ" अंधारात गेला...
Hanuman Sena News
0
Post a Comment