नांदुरा: येरळी येथे भाजपाच्या महिला मोर्चा आघाडीच्या वतीने सौ. अर्चनाताई शिवाजीराव पाटील यांनी हळदीकुंकवाच्या निमित्ताने त्यांच्या घरी विविध कार्यक्रम राबवले. सर्वात प्रथम राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचे पूजन ज्येष्ठ महिला भगिनी सौ. अलकाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.दरवर्षी 3 जानेवारी ते 12 जानेवारी हा पंधरवडा सावित्रीबाई फुले व जिजामाता यांनी जी भरीव कामगिरी केली त्या गोष्टीला उजाडा देण्यासाठी हा पंधरवडा साजरा करत असतो.नंतर आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या नेतृत्वात G20 चे नेतृत्व करीत आहे त्याबद्दल घरासमोर रांगोळीच्या रूपात G20 ची विशाल लोगो काढण्यात आला व सर्व भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या देशाचा तिरंगी झेंडा आपल्या हातात घेऊन इंडिया वेलकम G20 चे विशाल लोगो काढुन अशाप्रकारे प्रदर्शन केलं व वेलकम केलं नंतर आपल्या जिल्हा परिषद बुलढाण्याच्या अध्यक्षा सौ. उमाताई तायडे यांची निवड भारतीय जनता पार्टीच्या पंचायत व ग्राम विकास विभाग सहसंयोजक पदी नियुक्ती झाल्याबद्दल सौ. अर्चनाताई पाटील महिला मोर्चा नांदुरा तालुकाध्यक्ष यांनी भव्य दिव्य सत्कार बहुसंख्य महिलांचे उपस्थितीत घेतला. तसेच नांदुरा शहराच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ .सारिका ताई डागा यांना नवी दिल्ली येथील लोकशाहीर जलकल्याण सेवा समितीच्या वतीने देशातील समाजसेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण व भरीव कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री तथा वित्तमंत्री माननीय डॉक्टर श्री भागवत जी कराड यांच्या शुभहस्ते सावित्रीकन्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्यांचासुद्धा सत्कार सौ. अर्चनाताई पाटील महिला मोर्चा तालुका अध्यक्ष नांदुरा यांनी घेतला . सत्काराचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांना हळदीकुंकू व उपस्थित सर्व महिलांना वाण दिलेकार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत सौ. उमाताई तायडे मा.जि.प अध्यक्ष, सारिका ताई डागा भाजप महिला मोर्चा नांदुरा शहराध्यक्ष, जिल्हा सचिव प्रज्ञाताई लासुरकर,महीला मोर्चा उपाध्यक्ष ठोंबरे ताई,महीला मोर्चा सरचिटणीस अनीताताई चौधरी,बेटी पढाव बेटी बचाव च्या संयोजीका ज्योती ताई तांदळे, सोशल मीडिया प्रमुख रेणुताई बागा, देशमुख ताई ,बोदडेताई,नारखेडेताई, तांदळे ताई, तालुका उपाध्यक्ष आशा पाटील, सोशल मीडिया प्रमुख तालुका सुवर्णा पाटील,मंगला पाटील, हर्षा पाटील,रुपाली पाटील व येरळी येथील भाजपाच्या महिला पदाधिकाऱी व भाजपाच्या महिला कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.
माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली G20 ची रांगोळीच्या रूपात विशाल लोगो व हळदी कुंकवाच्या निमित्ताने राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचे पूजन व मान्यवरांच्या सत्काराची नियोजन...
Hanuman Sena News
0
Post a Comment