मलकापूर : राजमाता मा जिजाऊ यांचा जन्मोत्सव त्यांचा वाढदिवस 12 जानेवारीला असतो तर मराठी दिनदर्शिकेनुसार पौष पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. मलकापूर येथे राजमाता मा जिजाऊ जन्मोत्सव निमित्त हनुमान सेने तर्फे आज डॉक्टर जयश्रीताई खर्चे यांच्या जीवन ज्योती ब्लड बँक या ठिकाणी भव्य रक्तगट व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मलकापूर येथील रचना गॅसचे संचालक मनीष भाई लखानी यांची उपस्थिती लाभली. तसेच हनुमान सेना संपर्क कार्यालयावर मा जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून गरीब व गरजू लोकांना खिचडी वाटप करण्यात आली. यावेळी हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ टप ,तसेच नानाभाऊ येशी, माजी पंचायत समिती उपसभापती मधुकर धाडे, पंचायत समिती सभापती विनोद भाऊ क्षीरसागर, रविभाऊ वानखेडे, अजय बघे ,मेजर विजय सपकाळ, श्रीकांत नवग्रहे ,मोहन करांगळे,राजकुमार वानखेडे ,विरुभाई काशे,अनंता दिवनाले, कुणाल भाई ढोलकर,देविन टाक,ओम टप, ऋषी तेजोकार, प्रशांत काजळे, विशाल ठाकूर, आकाश गोरे, मोहन करांगळे, AP अमोल पाटील, पंकज पाटील, अमोल मोरे ,विनोद क्षीरसागर ,गजानन धाडे ,योगेश पाटील ,ऋषी नेमाडे ,शिवाजी केणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच 30 युवकांनी आपले रक्तगट तपासले व 19 युवकांनी रक्तदान केले. म्हैसवाडी येथील पोलीस पा. योगेश पाटील यांनी त्यांच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज हनुमान सेनेच्या माध्यमातून रक्तदान करण्याचा निर्णय घेतला व रक्तदान केले त्यांच्या या कार्यास मानाचा मुजरा करीत हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ टप यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांना गौरवले.
हनुमान सेने तर्फे राजमाता मा जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन...
Hanuman Sena News
0
Post a Comment