Hanuman Sena News

ठाकरे - आंबेडकर यांच्या युती बद्दल शरद पवारांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया...






शिवसेनेत उभी फूट पडल्याने याचा वाद निवडणूक आयोगासमोर सुरू आहे दुसरीकडे ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीत युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आहे तसेच सोमवारी ( 23 ) जानेवारी याबाबत घोषणा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं ठरलं की घोषणा होणार आहे. तसेच, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आमचा विरोध नाही, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.“उद्धव ठाकरेंबरोबर बोलणी सुरु आहे. अधिकृत घोषणा मी किंवा पक्षाच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर करतील. उद्धव ठाकरेंचं ठरलं की घोषणा होईल. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बरोबर घ्यावं असं शिवसेनेला वाटत आहे. दोन्ही पक्षांचं स्वागतचं करु. माझा दोन्ही पक्षांना विरोध नाही आहे,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबद्दल प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं. तेव्हा शरद पवार यांनी सांगितलं की, “मला याबाबत काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही,” असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.“काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला नाकारलं आहे वंचित आघाडीने फक्त दलितापुरतं मर्यादित राहावं ओबीसी आणि मराठा यांच्या संदर्भात आम्ही बोलू नये ही काँग्रेस राष्ट्रवादीची अट आहे ती आम्ही मान्य करण्यास तयार नाही आहोत तसेच आम्हाला तिसरा इंजन जोडणार आहे असं एकनाथ शिंदे मुंबईतील भाषणात बोलले होते हे तिसरं इंजिन राष्ट्रवादी आहे की मनसे याचा खुलासा एकनाथ शिंदे करतील असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

Post a Comment

Previous Post Next Post