Hanuman Sena News

चिखलीचे एक्झाम वॉरियर्स महाराष्ट्रात अव्वल ! आमदार श्वेता ताई महाले म्हणाल्या... "कठोर परिश्रमाने पास करा आयुष्याची परीक्षा"...









चिखली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या माध्यमातून देशभरात आयोजित करण्यात आलेल्या एक्झाम वॉरिअर चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वाधिक संख्येने सहभागी होण्याचा विक्रम चिखली विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी नोंदविला आहे 24 शाळेतील 6800 विद्यार्थ्यांनी या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दरम्यान परीक्षा कोणतीही असो जिद्द चिकाटी आणि मेहनत अंगी असावी लागते अभ्यासाशिवाय कुठलीच परीक्षा पास करता येत नाही आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत पास होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक असल्याचे प्रेरक विचार आमदार श्वेता ताई महाले यांनी या उपक्रमा संदर्भात व्यक्त केले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या संकल्पनेतून एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धा व्यापक स्वरूपात राबविली महाराष्ट्रात या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला चिखली विधानसभा मतदारसंघात एक्झाम वॉरियर्स चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वाधिक संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचा विक्रम केला आहे 24 शाळेत 6800 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली स्पर्धेसाठी 22631 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली बुलढाणा जिल्ह्यातुन 5663 व चिखली विधानसभा मतदारसंघातून 4110 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तसेच 2000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन करताना अडचणी आल्या त्यामुळे नोंदणी न करता परीक्षा दिली आहे आमदार श्वेता ताई महाले म्हणाले स्वतः आदर्श विद्यालयात जाऊन चित्रांची पाहणी केली तसेच त्यांच्याशी हितगुज सुद्धा साधले. परीक्षेच्या यशस्वी ते साठी भाजपा तालुका अध्यक्ष डॉ.कृष्णकुमार सपकाळ, सुनील देशमुख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष काळे ,देविदास जाधव पाटील, संजय महाले, सागर पुरोहित, सुहास जमदार, विनोद सीताफळे, बंडू अंभोरे, प्रशांत पाखरे, शंकर तरमळे ,डॉ राजेश्वर उंबरहंडे डॉ. तेजराव नरवाडे, विष्णू वाघ, संदीप उगले आदींनी पुढाकार घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post