नाशिक: सध्या राज्यात महापुरुषांच्या नावावरुन राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातच, शरद पवारांना 'जाणता राजा' म्हणण्यावरुन छगन भुजबळही भाजप नेत्यांच्या निशण्यावर आले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता भुजबळ यांनी बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.म्हणून जाणता राजा म्हणालो आज छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 'चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी अशाप्रकारची हस्यास्पद विधाने करू नये. शरद पवारांना जाणता राजा का म्हणालो, याचं स्पष्टीकरण मी आधीच दिलं आहे. पवारांनी शेतकऱ्यांचे 80 हजार कोटी रुपये कर्ज माफ केले, उद्योगधंदे आणले, देशाच्या अन् राज्याच्या विकासात योगदान दिलंय. म्हणूनच त्यांना जाणता राजा म्हणालो. याचा अर्थ मी त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करतो असं नाही,' असं भुजबळ म्हणाले.मोदी विष्णूचे अवतारते पुढे म्हणाले की, 'बसवेश्वरा महात्मा होते, त्यांना आपण आजही महात्मा म्हणतो. त्यानंतर महात्मा म्हणून आपण महात्मा फुलेंचा उल्लेख करतो. गांधीजींनाही महात्मा म्हणून संबोधतो. चांगली कामे करणाऱ्याला विशेषण दिलं तर अडचण काय आहे? तुम्ही नरेंद्र मोदींना विष्णूचा आवतार म्हणता, आम्ही काय म्हणालो? तुम्हाला ते विष्णूचे आवतार वाटतात तुम्ही म्हणा, आम्हाला पवार साहेब गोरगरीबांचा जाणता राजा वाटतात. कशाला वाद वाढवायचा...' असंही भुजबळ म्हणाले.
तुम्ही नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हणता, तर आम्ही पवार साहेबांना गरिबांचे जाणता राजा म्हणतो- छगन भुजबळ...
Hanuman Sena News
0
Post a Comment