मुरगूड :- वय अगदी बारा तेरा वर्षाच, सातवीत शिकणारा सक्षम तसा क्रिकेट वेडा, महेंद्र धोनी फार आवडायचा मग तो सांगतो गेम खेळा, टीम करा म्हणून बेस्ट प्लेअर निवडले आणि टीम केली, मंगळवारी रात्री भारत न्यूझीलैंड मॅच झाली आणि मला सर्वात जास्त पॉइंट मिळाले अस समजलं, अगदी अर्धा तासात माझ्या आईच्या बँक खात्यावर सुमारे सत्तर लाख जमा झाले आणि सुरू झाला एक आगळा वेगळा प्रवास, गेले दोन तीन दिवस अगदी घर भरून गेलं आहे. लोक सत्कार करताहेत, फोटो, सेल्फी, स्टेटस लावताहेत पण याने तसूभर ही विचलित न होता कोट्याधीश झालेला मुरगूड ता कागल मधील सक्षम बाजीराव कुंभार हा मुलगा सांगतो आहे मला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचं आहे.ऑनलाइन क्रिकेट गेम वर अनेकजण पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातील हा सक्षम अजिबात नाही, मोबाइल इंटरनेट याचे कमालीचे ज्ञान त्याला या कामी उपयोगी आले. कोरोना काळात शाळा बंद झाल्या पण मोबाइलच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण सुरू झाला अर्थातच त्यातच इंटरनेट आणि मोबाइल याच अफाट ज्ञान शेकडो विद्यार्थ्यांना मिळालं त्यातील एक सक्षम, सक्षम तसा शैक्षणिक दृष्ट्या ही सक्षम आहे. येथील मुरगूड विद्यालयात तो सेमीच्या सातवीच्या वर्गात शिकतो आहे.तर पाचवी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत तो चमकला आहे.सर्वच उपक्रमात त्याचा वावर ठरलेला असतो.क्रिकेट च प्रचंड वेड असलेला सक्षम भारतीय टीम मधील खेळाडूंची माहिती अगदी पटापट सांगतो पण अन्य देशातील ही कोणता खेळाडूकसा आहे याची जणू कुंडली त्याच्याकडे आहे. मंगळवार दि २४ जानेवारी अर्थातच शाळेचे गॅदरिंग सोमवरी झालेने त्याला मंगळवारी सुट्टी मिळाली आणि सक्षम भारत आणि न्यूझीलंड मॅच सूर होण्या अगोदर टीव्ही समोर बसला.आई बाबांना सांगत त्याने आपली टीम तयार केली. या संघामध्ये त्याने डी. कॉन्वेला संघाचा कर्णधार बनवला होता तर रोहित शर्माला उपकरणदार बनवला होता तसेच त्याच्या संघातील शार्दुल ठाकूर हार्दिक पांड्या शुभमंग येईल या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केल्याने त्याच्या ड्रीम वरील संघाने बक्कळ गुणांची कमाई केली सुमारे 80 लाख खेळणाऱ्या सदस्यांमध्ये सक्षमने तयार केलेल्या टीम मधील खेळाडूंनी गुणांची कमाई करण्यास सुरुवात केली सुमारे साडेबाराशे गुणांची कमाई झाली हे गुण सर्वाधिक ठरल्याने सुमारे एक कोटी रुपयांचा आपण मानकरी झालेच सक्षमला समजले ही बातमी आजूबाजूच्या लोकांना समजल्यानंतर काही कालावधीत त्याच्या खात्यावर सुमारे 70 लाख जमा झाले आणि गल्लीत गावात जल्लोष सुरू झाला. रात्रीचे ग्रामदैवत अंबाबाई चरण सक्षम नतमस्तक झाला आणि मंदिर वस्तूसाठी भरीव मदत करण्याचे अभिवचन त्याने दिले ज्या शाळेत तो शिकत होतो त्या शाळेत सर्व शिक्षकांनी त्याचा सत्कार केला या सर्वांच्या सक्षम भारावला होता पण त्याचा आत्मविश्वास मात्र कमी झाला नव्हता यापुढे आता असला खेळ खेळू नको असा सच्चार दम ही शिक्षकांनी जाता जाता दिला आणि सक्षम च्या सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याला बळ देण्याचे आश्वासनही दिले.
क्रिकेटचा वेड ठरलं लकी; कोल्हापूरचा सातवीत शिकणारा सक्षम झाला कोट्याधीश...
Hanuman Sena News
0
Post a Comment