Hanuman Sena News

प्रजासत्ताक दिना निमित्त मलकापुर शरातील पत्रकार वृन्द यांचा सत्कार...







मलकापूर: प्रजासत्ताक दिनाचे अवचित्य साधून सर्वसामान्य जनतेच्या हक्कांचे आणि हिताचे रक्षक असलेल्या आणि संपूर्ण देशाला सामाजिक आणि राजकीय वस्तुस्थितीची जाणीव करून देणारे लोकशाही चे तीसरे आभार स्तम्भ म्हणजे पत्रकार आणि अश्या पत्रकाराचे गौरव करण्यात आले.वीर हुतात्मा पत्नी सुषमा ताई राजपूत व पत्रकार धनश्री ताई कटीकर यांच्या हस्ते शहरातील प्रसिद्ध कापड दुकान ओंकार कलेक्शन येथे  ध्वजारोहन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणुन मलकापुर शरातील  जेष्ठ पत्रकार रमेशभाऊ उमाळकर तसेच पत्रकार बंधु कृष्णा मेहेसरे,विजय वर्मा, करण झनके,प्रदीप इंगले,करणसिंह सिरसवाल,दीपक इटनारे,धर्मेंद्रसिंह राजपूत यांची उपस्थिती लाभली.या वेळी वीर पत्नी सुषमा ताई राजपूत यांचे स्वागत जेष्ठ पत्रकार रमेशजी उमाळकर यांनी शाल व श्रीफल देऊन केले. तर धनश्री ताई यांनी त्यांना साडी भेट दिली.रमेशजी उमाळकर यांचे सत्कार ओमकार कलेक्शन यांचे संचालक रुपेशजी चौधरी यांनी शाल व श्रीफल देऊन केले. तसेच  उपस्थित सर्व पत्रकार बंधु यांना शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमात उपस्थित वीर पत्नी तसेच पत्रकार बंधु - भगिनी  यांचे आभार  सुयोगजी शर्मा यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post