Hanuman Sena News

काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सूतगिरणीवर जप्तीची कारवाई टळली...




बुलडाणा : सहकार क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे.  बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सुतगिरणीवर कारवाई चे सत्र सुरू झाले आहे. शुक्रवारी दुपार पासून जिल्हा बँकेचे अधिकारी सूतगिरणी वर ठाण मांडून आहेत. या सूतगिरणीवर 25 कोटींपेक्षा जास्त कर्ज असल्याचे समजते. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.न्यायालयाचे आदेशानंतर जिल्हा बँकेकडून सूतगिरणीवर जप्ती कारवाई सुरू करण्यात आली आहे. राहुल बोंद्रे यांच्या श्री मुंगसाजी महाराज या सूतगिरणी वर जिल्हा बँकेचे 25 कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे. वारंवार नोटीस बजावून सूचना करुन बोंद्रे यांनी थकबाकीची रक्कम भरलेली नाही.25 कोटींच्या कर्जाच्या थकबाकी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. वसुली पथकात बँकेचे 15 अधिकारी कर्मचारी असल्याचे समजते. बँकेच्या विशेष वसुली पथकाने ही कारवाई सुरु केल्याचे समजते. मात्र, बोंद्रे यांनी थकित कर्जातील काही रक्कम भरण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे ही कारवाई टळू शकते अशी माहितीही समोर आली आहे. सध्या या सूतगिरणीमध्ये अनेक कामगार काम करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post