परळी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला परळीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला आहे. यामध्ये मुंडे यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. यामुळे धनंजय मुंडे यांना एअर अॅम्बुलन्सने मुंबईला हलविले जाणार आहे.परळी शहरातील मौलाना आझाद चौकात हा अपघात झाला आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी आणि कामे आटपून धनंजय मुंडे घरी जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला आहे. याची माहिती धनंजय मुंडे यांनीच सकाळी दिली होती. धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला असून डॉक्टरांनी विसरलीचा सल्ला दिला आहे पुढील उपचारासाठी मुंडे यांना मुंबईच्या ब्रिज कॅन्डी रुग्णालयात आणले जाणार आहे यासाठी लातूरहून एअर ॲम्बुलन्स ची व्यवस्था केली जाणार आहे काळजी करण्यासारखी काही नाही कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान मुंडे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
धनंजय मुंडेंना एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलविणार...
Hanuman Sena News
0
Post a Comment