नांदुरा: 2 जानेवारी रोजी नांदुरा शहर भारतीय जनता पार्टी व तालुका च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. भाजपा नेते चैनसुख जी संचेती व भाजपा जिल्हाध्यक्ष आकाश दादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी महाराष्ट्राचे दैवत सर्वांचे श्रद्धास्थान धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बद्दल अतिशय घृणास्पद वक्तव्य करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्याची गरज नाही असे अतिशय वाईट व खालच्या दर्जाचे वक्तव्य केले त्याचा निषेध म्हणून नांदुरा शहर भारतीय जनता पार्टी व तालुक्याच्या वतीने आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले त्यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार मुर्दाबाद चे नारे देऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष संतोष भाऊ मुंडे तालुका महिला आघाडीचे अध्यक्ष माजी सभापती सौ अर्चनाताई शिवाजीराव पाटील ,भटके विमत्त जाती जमाती जिल्हाध्यक्ष शत्रुघन भाऊ पाचपोर, भाजपा नेते शिवाजीराव पाटील, गजानन भाऊ चरखे, माजी नगराध्यक्ष सुधीर भाऊ मुरेकर ,जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ सुपे, शहर उपाध्यक्ष प्रमोद हिवाळे, माजी तालुकाध्यक्ष शैलेश भाऊ मिरगे, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सचिन राणे, ब्रह्मानंद चौधरी, कैलास भाऊ डांगे, विनोद भाऊ भोजने, रामसिंग ठाकूर, उज्वल भाऊ लासुरकर ,निमगाव सरपंच विकास भाऊ इंगळे, बेटी पढाव बेटी बचाव चा शहर संयोजिका ज्योतीताई तांदळे, जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी सौ लताताई ठोंबरे ,सौ अनिताताई चौधरी जिल्हा सचिव, विनोद गव्हाळ, सुनील खवले, संदीप बहुरुपे ,विनोद भोपळे, राजेंद्र कापडे व उपस्थित कार्यकर्ते होते
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्ष नेते अजित पवारांबद्दल नांदुरा भाजपा तर्फे तहसीलदारांना निवेदन...
Hanuman Sena News
0
Post a Comment