मलकापूर: समाजातील सर्व स्तरांच्या स्त्रियांत विशेषप्रसंगी स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ करण्याची पद्धत अविरत सुरू आहे. हे समारंभ म्हणजे गृहिणीपूजन, आदरसत्कार व स्नेहमीलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टीचे प्रतीक आहे.मलकापुर शहरातील माता महाकाली मंदिर, माता महाकाली नगर येथे विप्र नारी सेवा संस्था द्वारे बहुभाषीय ब्राह्मण महिला यांचे हल्दी कुंकू चे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन विप्र नारी जिल्हा अध्यक्ष ॲड. अर्चना सुनिल शुक्ला यांच्या हस्ते झाले तर माल्या अर्पण तालुका अध्यक्ष सौ निधि शर्मा यांनी केले तर दीप प्रज्वल सौ वैशाली जोशी,सौ अलका सावजी यांच्या हस्ते करण्यात आले नंतर सामुहिक गणेश वंदना करण्यात आली.ॲड. अर्चना सुनिल शुक्ला यांनी आपल्या संस्कृती मध्ये हळदी कुंकूचे महत्त्व उपस्थित महिला वर्ग यांना सांगितले.उपस्थित शेकडो महिला यांनी उखाने घेऊन एक मेकांना हल्दी कुंकू लावून वान दिले.उपस्थित महिला, विप्र नारी संघटनेच्या सदस्या यांनी सहकार्य केल्याबद्दल तसेच माता महाकाली मंदिर संचालक मंडल यांनी जागा उपलब्ध करुण दिल्याबद्दल यांचे आभार विप्र नारी शक्ति संस्था तालुका अध्यक्ष सौ निधि विशाल शर्मा यांनी मानले.
विप्र नारी सेवा संस्था मलकापुर द्वारे हळदी कुंकू उत्सव साजरा...
Hanuman Sena News
0
Post a Comment