मलकापूर: भारतात दरवर्षी सरासरी सहा लाख अपघात होतात त्यामध्ये सुमारे 1 लाख 14 हजार प्रवासी मृत्युमुखी पडतात अपघातांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी 1ते 15 जानेवारी या काळात रस्ता सुरक्षितता अभियान देशभर राबविण्यात आली त्याचाच एक म्हणून दि.16/1/2023 सोमवार ला मलकापूर तालुक्यात रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत जनजागृती मोहीम करण्यात आली.त्यामध्ये मलकापूर शहराचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सानप साहेब, पोलीस हवालदार महेश चोपडे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश तायडे ,आनंद माने, दुर्गासिंग सोळंके व जिल्हा वाहतूक शाखेचे पोना. दिलीप रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख यांनी ट्रॅक्टर, मालवाहू गाड्या, ऑटो रिक्षा यांच्यावर रेडियम स्टिकर लावले व सुरक्षतेचे नियम संबंधित चालकांना सांगण्यात आले व रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती करण्यात आली तसेच रस्ता अपघातांची कारणे, अपघातांचे प्रकार व अपघातांची ठिकाणे, अपघातांची वेळ या विषयावर वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यात आली
मलकापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात आली...
Hanuman Sena News
0
Post a Comment