मलकापूर: शहरातील बडा हनुमान मंदिर येथे हनुमंताच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट व कानातील आभूषणाची चोरी झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. गत दोन महिन्यात दुसऱ्यांदा या मंदिरात चोरी झाली आहे .मंदिराचे पुजारी गजेंद्र शर्मा यांनी रात्री मंदिर बंद करून गेले होते. सकाळी सहा वाजता सुद्धा एका भक्ताने पूजा केली असता हनुमंताचा मुकुट होता. मात्र सात वाजेच्या सुमारास ते चोरी गेल्याचे एका भक्ताच्या निदर्शनास आले. पुजारी गजेंद्र शर्मा यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार नोंदवली आहे. पुढील तपास मलकापूर पोलीस करीत आहे.
सूर्यमुखी बडा हनुमान मंदिरातील मुकुटाची चोरी...
Hanuman Sena News
0
Post a Comment