अमरावती: हावडा येथून मुंबई पुणे जाणाऱ्या रेल्वे नियमित सात ते आठ तास उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांना व विद्यार्थ्यांना, रुग्णांना नेहमी त्रास सहन करावा लागत आहे. त्या अनुषंगाने आज मा. खासदार नवनीतजी राणा यांना निवेदन देण्यात आले.जवळपास 10 ते 12 महीने झाले हावडा येथून मुंबई व पुण्याला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या जसे हावड़ा मुंबई मेल, शालीमार एक्स, आजाद हिन्द एक्स,गितांजली एक्स, हावडा एल.टी.टी एक्स, ज्ञानेश्वरी एक्स, पुणे हमसफर एक्स ,मुंबई सी.एस.टी सुपरफ़ास्ट एक्स, पुणे गरीब रथ, ह्या रोज धावणाऱ्या गाड्या सुमारे ७ ते ८ तास उशिराने धावत आहे. त्यामुळे ह्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. काही लोकांना दवाखान्याचे काम असते तर काही विद्यार्थी परीक्षेसाठी मुंबई, पुणे येथे जात असतात. व्यापारी सुद्धा काही कामा निमित्य मुंबई येथे ये-जा करत असतात. अश्यात ह्या सर्व रेल्वे गाड्या ७ ते ८ तास उशिरा धावत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज आपला देश बुलेट ट्रेन कड़े वाटचाल करीत असतांना दुसरीकडे ह्या गाड्या रोज ७ ते ८ उशिराने धावणे ही मोठी शोकांतिका आहे या आधी सुद्धा रेल्वे ला निवेदन देऊन त्यावर कुठलाच मार्ग निघाला नाही आणि सदर गाड्या केव्हा पर्यंत सुरळीत होतील याची खात्री त्यांना सुद्धा नाही, म्हणून आपणाकडे निवेदन सादर करीत आहोत.
ह्या गाड्या जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत इतर ज्या सुपर फ़ास्ट गाड्या आहेत जसे गितांजली एक्स, मडगांव एक्स. व इतर सुपर फ़ास्ट गाड्यांना नागपुर ते भुसावल पर्यंत सर्व स्टेशन वर थांबा देण्यात यावा. किंवा शालीमार एक्स., हावडा मेल , आज़ाद हिन्द ह्या सर्व गाड्या नागपुर ते मुंबई, पुणे पर्यंतच चालविण्यात याव्या. किंवा अहमदाबाद पूरी एक्सप्रेस मडगाव एक्सप्रेस यांना मुर्तिजापुर येथे थांबा मिळावा अथवा बडनेरा भुसावल मेमो पॅसेंजर गाड़ी बडनेरा येथून सायंकाळी ५.०० वाजता काढावी जेणे करुन जे विद्यार्थी शाळा, काँलेज, कोचिंग क्लासेस करीता सकाळी भुसावळ, मलकापुर, नांदुरा, शेगांव, अकोला येथून अमरावती येथे शिक्षणा करीता येतात त्यांचे व इतर प्रवाश्यांचे परत आपल्या गावी जातांना हाल होणार नाही तरी सर्व गाड्या सुरळीत होतील यासाठी आपण प्रयत्न करावे व प्रवाशांना होणारा नाहक त्रास कमी करावा.असे निवेदन मा.खासदार नवनीत राणा यांना दिले
Post a Comment