Hanuman Sena News

बाते कम, काम ज्यादा ! पाच दिवसात सहा ठिकाणी 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत-एलसीबीची कारवाई...






बुलढाणा: नवीन वर्षात स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी प्रमुख पदी नव्याने नियुक्त झालेल्या अशोक लांडे यांनी कारवाईचा धडाका लावला 2023 या वर्षातील 11 ते 15 जानेवारी दरम्यान जिल्ह्यातील शेगाव, चिखली, खामगाव, रायपूर, हिवरखेड, देऊळगाव राजा या सहा ठिकाणी विविध कारवाईत 11लाख 45 हजार 575 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी जिल्हा पोलीस दलाचा पदभार घेतल्यापासून त्यांनी अवैध धंदे व गैरप्रकाराचे समोर उच्चाटन करण्याचे योजिले त्यांच्या मार्गदर्शनात नव्याने रुजू झालेले एलसीबी प्रमुख अशोक लांडे देखील 'बाते काम, काम जादा' या पद्धतीने कामास लागले अवैध दारू वरली मटका प्रतिबंधित गुटखा गांजा अमली पदार्थावर कारवाईचा बडगा उभारला 11 जानेवारीला शेगावात दहा किलो गांजा जप्तीची कारवाई झाली .आरोपी सहजाद खान फिरोजखान (26 )राहणार अहमदाबाद गुजरात यांच्याकडून 1,20,000 रुपयांचा गांजा पकडण्यात आला दुसरी कारवाई चिखलीत वरली मटक्यावर झाली 10,505 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अनंत सपकाळ राहणार तांबुळवाडी चिखली याला ताब्यात घेण्यात आले 12 जानेवारीला खामगाव शहरातील वरली अड्ड्यावर कारवाई झाली  4153 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी प्रमोद बिस्सा राहणार खामगाव याला ताब्यात घेण्यात आले. रायपूर हातभट्टीवर छापा मारून 12807 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी युसुफ बर्डे शेर खा बाबुल खा राहणार जामठी बुलढाणा यांच्यावर कारवाई करण्यात आली. 13 जानेवारीला हिवरखेड येथे दारू विक्री करणाऱ्या वर कारवाई करून आरोपी शुभम गायकवाड राहणार काळेगाव खामगाव त्याला ताब्यात घेऊन 16525 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच 63550 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा हस्तगत करण्यात आला. आरोपी शेख इरफान शेख गुलाब नबी याला अटक करण्यात आली. खामगाव देखील 918000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला सध्या खान अय्यद खान मोहम्मद इलियास राहणार खामगाव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे यांची विचार या कारवाईने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे

Post a Comment

Previous Post Next Post