मलकापूर :- मलकापूर येथे ज्ञानाच्या अथांग महासागर असलेले बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे.मलकापूर येथील रेल्वे स्टेशन जवळील भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेऊन मेणबत्ती प्रज्वलित करीत 66 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष धनश्री काटीकर, विदर्भ सचिव सतीश दांडगे, उल्हास शेगोकार तालुका अध्यक्ष अजय टप विदर्भ प्रसिद्ध प्रमुख करणसिंग शिरस्वाल, नथुजी हिवराळे, विनायक तळेकर, योगेश सोनवणे सय्यद ताहेर, प्रभाकर इंगळे,भिवा चोपडे आधी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहुन ज्ञानाच्या अथांग महासागरास अभिवादन करण्यात आले आहे .
हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...
Hanuman Sena News
0
Post a Comment