Hanuman Sena News

जिल्हा कारागृहात कैदी मावेना क्षमतेपेक्षा चारपट अधिक कैदी...








बुलढाणा: जिल्ह्यात वेगवेगळ्या गुन्ह्याची संख्या वाढली आहे तसेच वाढत्या गुन्ह्यांबरोबरच गुन्हे उघडकीस येण्याची संख्या वाढल्याने अटक करण्यात येणाऱ्या आरोपीची संख्याही वाढली आहे. सध्या जिल्हा कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यातील 397 आरोपी आहेत ही संख्या क्षमतेपेक्षा चार पट अधिक असून त्यामुळे कारागृहात प्रशासनावर अधिकचा ताण वाढत आहे. कारागृहाची क्षमता 101 एवढी आहे मात्र सध्या कारागृहात विविध प्रकारच्या गुन्ह्यातील तब्बल 397 बंदीवान आहेत या संकेत दिवसाला चढ- उतार होत असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली .सध्या असलेल्या कैद्यांमध्ये 45% कैदी हे 18 ते 30 वयोगटातील असून तरुण गुन्हेगार बनत असल्याची बाब चिंतीत करण्याची आहे. कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दररोज एका कैद्याला 300 ग्रॅम गहू तर 150 ग्रॅम तांदूळ एवढे अन्नधान्य दिले जाते. त्यानुसार सध्या कारागृहातील 400 कैद्यांसाठी दोन्ही वेळचे जेवणासाठी 120 किलो गहू तर 60 किलो तांदूळ लागत असून या सोबतच इतर साहित्यही लागत असल्याची माहिती देण्यात आली. कैद्याच्या दृष्टीने खुणाचा गुन्हा सर्वात गंभीर मानला जातो. अशा गंभीर गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीची संख्या 117 एवढी आहे वराडातील इतर जिल्हा कारागृहापेक्षा ही संख्या अधिक असल्याची माहिती आहे. सोबतच या ठिकाणी असलेल्या एकूण 21 महिला कैद्यांपैकी 14 महिला कैदी या खुनाच्या गुन्ह्यातील असल्याच्या धक्कादायक माहिती समोर आली आहे.रागावर नियंत्रण राहिलेलं नाही त्यामुळे लहान सहान गुन्हे करत आहेत. मात्र कायदा सगळ्यांसाठीच सारखा असून शिक्षा तर होणारच आहे. मात्र कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनावर ताण येतोय

Post a Comment

Previous Post Next Post