बुलढाणा: गेल्या काही दिवसापासून जगभरात कोरोना व्हायरसची प्रकरणी झपाट्याने वाढत आहेत. चीनमध्ये तर कोरोनाने कहर केला आहे. चीनमध्ये आढळून आलेल्या नव्या व्हेरिएंटची भारतातही रुग्ण आढळले आहे. सरकार अलर्ट झाले या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बैठक घेतली. या बैठकीला बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रेमचंद राठोड यांचीही ऑनलाईन उपस्थिती होती. जपान अमेरिका,कोरिया, ब्राझील यासारख्या देशांमध्ये कोविड रुग्णांमध्ये वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकाऱ्यांची व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यात कोविडचे प्रमाण कमी होत असून या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत नवीन रुग्णसंख्या 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. तसेच प्रयोगशाळेचा पॉझिटि दर 0.29 टक्क्यांनी घटला आहे. राज्यातील अकोला, पुणे, अहमदनगर आणि जळगाव या जिल्ह्यांचा हा दर एक पेक्षा अधिक आहे राज्यात मागील आठवड्यात 16 रुग्ण भरती झाले आहे त्यापैकी आठ रुग्णांना आयसीयू ची गरज भासली होती. राज्यात आज 135 रुग्ण क्रियाशील आहेत. दरम्यान परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्य मंत्री सावंत यांनी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य विभागाला संबोधित करून दक्षतेचे निर्देश दिले आहेत.
सावधान कोरोना पसरतोय..? बुलढाण्यात आरोग्य विभागाला दक्षतेचे निर्देश...
Hanuman Sena News
0
Post a Comment