महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मागील काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानानंतर राळ खाली बसत नाही, तोच भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबाबत अजब वक्तव्य केलं आहे. ‘शिवरायांचा जन्म कोकणात’ झाल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. यानंतर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील चांगलेच संतप्त झाले आहेत.“शिवाजी महाराज यांच्याबद्दल ज्यांना माहिती आहे, त्यांनी यावर बोलावं. शिवरायांबाबात वाकडं तिकडं बोललं, तर कोणत्याही पक्षाचा असो माफ केलं जाणार नाही. शिवाजी महाराज हे देवाचे देव आहेत. शिवरायांच्याबद्दल बोलण्यासाठी एक आचारसंहिता करण्याची गरज आहे. महाराजांच्या नखाची बरोबरी या नालायकांकडून होऊ शकत नाही. मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही,” असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.कोकण महोत्सवात बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, “स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला यानंतर रायगडावर झाले त्यांचे बालपण गेले रायगडावर स्वराज्याची स्थापना केली असे त्यांनी यावेळी म्हटले
"मंत्रीपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अपमान केल्यास..", गुलाबराव पाटील संतप्त...
Hanuman Sena News
0
Post a Comment