कर्नाटक सरकार, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचे निलंबन व विरोधकांच्या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या आमदारांनी शुक्रवारी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरूप विधानसभा भरवत त्यांनी सरकारविरुद्ध आंदोलन केले. यावेळी काळ्या पट्ट्या बांधून आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोमवारी जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेण्यास त्यांच्याकडून दबाव येऊ शकतो. सीमाप्रश्नी सोमवारी ठराव घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडू, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याच दरम्यान यावरून मनसेने निशाणा साधला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हि़डीओ शेअर केला आहे. "पोटातलं ओठांवर आलंच. राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेली सेना. आमची शिवसेना राष्ट्रवादीची शिवसेना – जयंत पाटील... भास्कर जाधव यांनीही मान्य केलं आहेच!" असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे. विधानसभा अजित पवार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे जयंत पाटील आमचे शिवसेना आहे राष्ट्रवादीचे शिवसेना आहे असं विधान केलं त्यावर भास्कर जाधव यांनी दिलखुलासपणे हसत दाद दिल्याच पाहायला मिळत आहे.यावरुनच मनसेने खोचक टोला लगावला आहे.
पोटातलं ओठावर आलंच राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेली सेना मनसेचा टोला...
Hanuman Sena News
0
Post a Comment