Hanuman Sena News

राऊतांना प्रत्युत्तर देताना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली...






बुलढाणा: शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. गायकवाडांनी थेट प्रसारमाध्यमांसमोर गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. याचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियातही व्हायरल होत आहे.शिंदे गटाचे बुलढाण्याचे लोकप्रतिनीधी आक्रमक होताना दिसत आहेत. आदित्य ठाकरेंना आव्हान देणारे आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांमध्ये वेगवेगळी वक्तव्यकरीत स्वतःकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत केले आहे. आजही संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी जहाल भाषा वापरली.राऊतांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली आहे. त्यांनी राऊतांना थेट शिवी दिली. शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.संजय गायकवाड म्हणाले, “आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर आम्ही उठाव-क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे (शिवी...) संजय राऊत तू यापुढे अशी भाषा वापरू नको. राहिला प्रश्न आम्ही लढायचे की पडायचे, तर आमचा निर्णय जनतेला मान्य आहे.संजय गायकवाड म्हणाले, तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. शिवसेना-भाजपा म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिले होते. अमिताभ बच्चनचा डायलॉग चित्रपटासाठी ठीक आहे, पण महाराष्ट्रात आमच्या किती जागा निवडून येतात आणि तुमच्या किती जागा निवडून येतात ते आपण बघू संजय राऊतांनी नाशिक दौऱ्यावर असताना शिंदे गटावर निशाणा साधला. चित्रपटांमध्ये जसे अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असे कोरले गेले. तसेच शिंदे गटाच्या आमदारांच्या कपाळावर ‘गद्दार’ असे कोरले आहे. यांचा त्रास त्यांना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत होईल संजय गायकवाड म्हणाले विचारांचे शत्रू असतात वाघाचे कोणी शत्रू असतो का मला त्याचा काही फरक पडत नाही जी शिवसेना काँग्रेस युती आघाडीचे चालले असेल सच्चा बाळासाहेब ठाकरे कडील शिवसेनेचा हात काँग्रेसच्या चिन्हाकडे कधीच जाऊ शकत नाही जरी गेला तर ते बाळासाहेबांची अवलादच नाही जे सैनिक बाळासाहेबांना मानतात त्यांचा हात कधीच काँग्रेसकडे जाऊ शकत नाही जे काही बाळासाहेबांचे सैनिक नसतील जे ठेकेदार असतील अशांना काही फरक पडत नाही ते कमर्शियल असतात

Post a Comment

Previous Post Next Post