मलकापूर: शहर व तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून जप्त करण्यात आलेल्या दहा लाखांच्या देशी विदेशी दारूचा जप्तीचा माल पोलिसांनी बुधवारी पालिकेच्या बेलाड शिवारात नष्ट केला. कोर्टाच्या आदेशाने मलकापूर शहर पोलिसांनी 135 गुन्ह्यातील 2017 पासून ते 2021 या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या दारू नष्ट करण्यात आली. नष्ट करण्यात आलेल्या दारूमध्ये देशी-विदेशी अशा विविध प्रकारच्या कंपनीच्या बॉटल असून साधारण 12 हजार बॉटल नष्ट करण्यात आले आहेत. हा सर्व मुद्देवाल मलकापूर शहर पोलीस अंतर्गत असलेल्या नगरपरिषद डम्पिंग ग्राउंड मध्ये नष्ट करण्यात आला मुद्देमाल नष्ट करताना पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, राज्य उद्घाटन शुल्क निरीक्षक किशोर पाटील, दुय्यम निरीक्षक प्रकाश मुंगळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक निलेश देशमुख तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता म्हसाये, पहुरकर मुंशी, आनंद माने, प्रवीण काकडे, शैलेश सोनवणे, संजय गायकवाड, मंगेश संनगाडे, नगरपालिका कंत्राटदार रुपेश बांगडे, सफाई कामगार अजय इंगळे, सागर फटाणे कर्मचारी उपस्थित होते.
जप्त केलेली देशी-विदेशी दारू पोलिसांनी केली नष्ट...
Hanuman Sena News
0
Post a Comment