मुंबई: 'मी रिअॅक्शनरी मुव्हमेंटवर अजिबात फसणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर आरोप केले तर मी त्यावर उत्तरे देत बसणार नाहीत. हा त्यांचा ट्रॅप आहे. ते गृहमंत्री झाल्यापासून 2011 ते 2015 या काळात भाजपच्या आरोप झालेल्या सर्व 15 लोकांना त्यांनी क्लिनचिट दिली. हा मुद्दा मी सोडणार नाही. ते कितीही डायव्हर्ट करतील पण मी आयडाॅलाॅजीकली क्लिअर आहे. माझे व्हिजन क्लिअरकट आहे'' असे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना ठणकावले.महापुरुष आणि संतांच्या अपमानाबद्दल आज देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत हल्लाबोल केला. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.सुषमा अंधारे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते आहेत. त्यांची अभ्यासू प्रतिक्रीया अपेक्षित आहेत. मी फुले, शाहू आंबेडकर, कबीर यांच्या विचारधारेतील आहे. माझी जडणघडण त्याच विचारधारेतील आहे. फडणवीसांना आक्षेप असतील तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, प्रबोधनकारांनी आणि क्रांतिबा महात्मा फुले यांनी लिहिलेली पुस्तके ज्याच्यावर सरकारी समित्या काम करतात. हे सर्व साहित्य खोटे, चुकीचे आहे हे साहित्य मी जाळून फाडून टाकतो असे सभागृहात म्हणतील का? सुषमा अंधारे म्हणाल्या, मला काय तोडायचे, फाडायचे, मारायचे, कापायचे धर्माचे शस्त्र घेवून ते करायला काही हरकत नाही. कारण देवे्ंद्रजी त्यांची टीम भक्तुल्यांना तेरा वर्षे काहीच बोलावेसे वाटले नाही हे मी तेरा वर्षांपासून बोलतेय. पण आता मी शिवसेनेतून बोलत असल्याने व त्यांच्याकडे उत्तरे नाही. त्यामुळे त्यांना मुळ चर्चेला बगल द्यायची त्यामुळे हे ते आज बोलत आहे.सुषमा अंधारे म्हणाल्या, मुळ प्रश्न आणि चर्चा ही आहे की, 83 कोटींचा भुखंड 2 कोटींना कसा विकला गेला. भाजपच्याच आमदारांनी हा प्रश्न तारांकित म्हणून नोंदवला. चार मंत्र्यांवर आरोप झाले आहेत. ते चार मंत्री शिंदे गटातील आहेत. टीम भाजप पद्धतशीरपणे एकनाथ शिंदे व त्यांच्या मंत्र्यांना अडचणीत आले आहेत. ते पद्धतशीर कटकारस्थान करीत आहेत.सुषमा अंधारे म्हणाल्या, चर्चेची राळ उठवायची आणि दुसरीकडे कटकारस्थान करायचे ही देवेंद्र फडणवीस यांची बुद्धी अचाट आहे. मंत्री तानाजी सावंत यांचे बंधु शिवाजी सावंत यांनी पैसे खर्चून माणसे आणली आहेत. सभेसाठी तथाकथित माणसे आणली होती त्यामुळे पोलखोल कशी असते हे मला विचारा. लै चिक्कार चांगला पंचनामा मी करू शकते.सुषमा अंधारे म्हणाल्या, श्री श्री रविशंकरांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर भुमिका काय आहे, माऊली, तुकोबारायांपेक्षा मनू श्रेष्ठ होता असे म्हणणाऱ्या संभाजी भिडेंबद्दल देवेंद्र फडणवीसांची भुमिका काय आहे. भिडे गुरुजींना अटक कराल का कारण त्यांना आपणच क्लिनचिट दिली.सुषमा अंधारे म्हणाल्या, मी रिअॅक्शनरी मुव्हमेंटवर अजिबात फसणार नाही. तुम्ही माझ्यावर आरोप केले तर मी त्यावर उत्तरे देत बसणार नाहीत. हा ट्रॅप आहे तुमचा, कारण तुम्ही गृहमंमत्री झाल्यापासून 2011 ते 2015 या काळात ज्या ज्या भाजपच्या लोकांवर आरोप झाले. त्या सर्व १५ लोकांना क्लिनचिट दिली हा मुद्दा मी सोडणार नाही. तुम्ही कितीही डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला तरीही मी आयडाॅलाॅजीकली क्लिअर आहे. माझे व्हिजन क्लिअरकट आहे.सुषमा अंधारे म्हणाल्या, सर्व क्लिनचिट डिसेंबरमध्येच कशा काय? 15 लोकांना क्लिनचिट देताना स्वतःलाही क्लिनचिट देणे कोणत्या तत्वात बसते. अदालत भी मेरी, कानुन भी मेरा, मुजरीम भी मै, जज भी मै..देवेंद्र जी लोक काही बगलात रेडीओ घेऊन फिरत नाहीत.सुषमा अंधारे म्हणाल्या, कपट कारस्थान करताना किमान प्रत्येकवेळी समोरचा माणूस फार दुबळा आहे हा गैरसमज ठेवू नका. कारण आपण अभ्यासू आहात मीही आपलीच बहिण आहे. त्यामुळेच मी अभ्यास करूनच उत्तर देते. एकनाथ खडसेंना भुखंडासाठी राजीनामा घ्यायला भाग पाडणारे तुम्ही आणि दुसऱ्या एकनाथाला वेगळा न्याय का देत आहात तुम्ही. चार मंत्र्यांच्या भ्रष्ट्राचाराचे काय?
देवेंद्र फडणवीसांच्या ट्रॅपमध्ये मी फसणार नाही:गृहमंत्री होताच त्यांनी 15 लोकांना क्लिनचिट दिली, हा मुद्दा लावूनच धरणारच - सुषमा अंधारे...
Hanuman Sena News
0
Post a Comment