बुलढाणा: मुदत संपलेल्या जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 2 डिसेंबर रोजी होती निवडणूक आयोगाच्या वेबसाईट मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शेवटच्या दिवशी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊसच पडला जिल्हा सरपंचाच्या 279 जागांसाठी 1हजार 447 सदस्यांसाठी तब्बल 5 हजार 292 उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यंदा सरपंच पदाची थेट जनतेतून निवड होणार असल्याने या पदाची अनेकांमध्ये क्रेझ आहे. त्यामुळे प्रत्येक गावातच सरपंच पदासाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यात काही दिग्गज उमेदवारांचाही समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी बुलढाणा आणि मलकापूर वगळता इतर तालुक्यात एकही अर्ज दाखल झाला नव्हता. सुरुवातीला दोन ते तीन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संख्या कमी होती. त्यानंतर गर्दी वाढल्याने निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अडचणी निर्माण झाल्या, अखेर निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली. जिल्ह्यातील 279 ग्रामपंचायत साठी दाखल झालेला उमेदवाराची अर्जाची 5 डिसेंबर रोजी छाननी करण्यात येणार आहे. यामध्ये किती उमेदवार अर्ज बाद होतात याकडे इच्छुकांचे लक्ष असणार आहे. तसेच 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे त्यानंतर रिंगणातील उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप होणार आहे. गावामध्ये अनेकांनी अर्ज दाखल केल्याने पॅनलच्या उमेदवाराची अडचण झाली आहे. ही निवडणूक राजकीय पक्षाच्या माध्यमातून लढल्या जात नसली तरी राजकीय पक्ष समर्थित पॅनेल रिंगणात असतात .आपल्या पॅनलचे सर्व सदस्य निवडून येण्यासाठी आता पॅनल प्रमुख कामाला लागले आहेत. यामध्ये बंडखोराची मंनधरणी सुरू झाली आहे. यात त्यांना कितपत यश येते हे 7 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.
ग्रा.पं. सरपंचासाठी 1447 तर सदस्य पदासाठी 5292 अर्ज...
Hanuman Sena News
0
Post a Comment